NIRANARSINGPUR

|| ॐ नृसिंहाय नमः ||

  • श्री विष्णूंनी घेतलेला श्री नृसिंह अवतार

    श्री नृसिंहाचा अवतार झाला तो मुलस्थान या क्षेत्री, हे सध्या मुलतान या नावाने पाकिस्तानात प्रसिद्ध आहे. हिच हिरण्यकश्यपूची राजधानी होती आणि त्याचा वधही तेथेच झाला. दुष्ट दैत्याचा वध व प्रल्हादासारख्या सज्जनाचे रक्षण करावयाचे म्हणून तर भगवान महाविष्णूंनी श्री नृसिंह रुपे चतुर्थावतार घेतला. अर्थातच दशावतारांपैकी हाच एक चतुर्थावतार

  • श्री क्षेत्राविषयी

    काही क्षेत्रांना त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानामुळे देवभूमी मानले जाते. अत्युच्च हिमालयात वसलेली बदरी केदार, अमरनाथ, ही क्षेत्रे प्रसिद्धच आहेत. कालिदासाने म्हटल्याप्रमाणे 'पितु: प्रदेशास्तव देवभुमय:' | याचाच अर्थ हे पार्वती ,तुझ्या पित्याचा हा प्रदेश (हिमालय) म्हणजे देवांचे निवासस्थानच आहे.