दिनांक १६ नोव्हेंबर २०२० (कार्तिक शु. १ – शके १९४२ ) बलीप्रतिपदा (दिवाळी पाडवा) रोजी श्रीलक्ष्मी देवस्थान मंदीर महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये भक्तांसाठी उघडण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने मंदिर उघडण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल श्रीलक्ष्मी देवस्थान ट्रस्ट चा विश्वस्त या नात्याने महाराष्ट्र शासनाचे हार्दिक आभार आज सकाळी पहाटे साडेपाच वाजता लक्ष्मी नरसिंह मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी उघडण्यात आले.
दिवसभरात एकूण ५२४ भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला शासनाने दिलेल्या नियमानुसार मंदिरात बंदोबस्त ठेवण्यात आला होता इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सारंगकर साहेब पोलीस सय्यद यांनी मंदिराला भेट दिली व परिस्थितीची पाहणी केली आज मंदिरात कुरवंड्या व पालखी सोहळा असतो तोही व्यवस्थित पार पडला काल रात्री मंदिर पूर्ण सॅनिटायझ केले होते येणाऱ्या भक्तांना मास्क व सॅनिटायझर करूनच सोडण्यात आले होते संध्याकाळी पाच वाजता बावडा औटपोस्ट चे पोलीस उपनिरीक्षक बिरप्पा लातूरे साहेब पोलीस मोरे आप्पा पोलीस नवले साहेब यांनी भेट दिली.
सर्व नरसिंह भक्तांनी केलेल्या सहकार्याबद्दल मंदिर समिती कडून भक्तांचे मनःपूर्वक आभार.