हे नरसिंहपूर येथील धर्माधिकारी घराण्यातील, यांनी आपले अवघे जीवन श्रीनृसिंहास व त्याच्या भक्तीस वाहिले. त्रिकाल स्नान व संध्याभ, श्रीनृसिंहकवच व सहस्रनाम यांचे पाठ जागृतावस्थेत सतत चालु असत. असे अनुष्ठान तीन तपे केले. एक नेसूचे धोतर व उपरणे याशिवाय अन्य् वस्त्रे वापरली नाहीत. श्मश्रू करणे व पादत्राणे घालणे हे तर वर्ज्याच होते. ग्रामसीमा न ओलांडणे व परात्र भक्षण न करणे ही पथ्ये होती. रात्री अपरात्री मनी इच्छा होताच ते कवचस्तोत्राचे कवच त्यांना लाभल्या्ने सर्प विंच्वायदिक त्यांच्या मार्गी जात येत नसत. सर्व व्यक्तिगत इच्छा आकाक्षांचा त्याग केलेला हा तेजःपुंज ब्राम्हण नृसिंहभक्तीचा एक उत्कर्ष व गावाचे भूषण होते. म्हणतात की, त्यांनी तपश्चर्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघ या संघटनेच्या अभ्युदयार्थ केली. सतत तपाचरण करीत राहिलेले हे पवित्र तुळशीपत्र श्रीनृसिंहचरणी वाहिले गेले.