नदीवरील पवित्र तीर्थे

नीराभीमा-संगमावरुन नीरेच्या प्रवाहाच्या उलट दिशने वर जाताना नीरा नदीवर जी तिर्थे लागतात ती व त्यांचे माहात्म्य अनुक्रमे असे आहे.

लक्ष्मीतीर्थ : हे देवालयाच्या पश्चिम दरवाज्याच्या डाव्या बाजूस आहे. येथील घाटास लक्ष्मीघाट असे म्हणतात. घाटावर श्रीलक्ष्मीचे देवालय आहे. या स्थानी लक्ष्मीने तपर्श्चा केल्याने तिचा चंचलत्वा‍चा दोष निघून गेला. शुक्रवारी या तीर्थाचे स्थान व तेथील श्रीलक्ष्मीचे पूजन यांचा महिमा विशेष आहे.

पद्मतीर्थ : लक्ष्मीतीर्थाच्या वरच्या बाजूस पद्मतीर्थ आहे. चंचलत्व दोषपरिहारार्थ लक्ष्मीने तप केले, तेव्हा श्रीनृसिंह प्रसन्न झाले. भगवद्र्शनाच्या प्रेमानंदाने लक्ष्मीच्या हातातील पद्म या स्थानी गळून पडले. तसेच कुबेराला धनप्राप्ती याच स्थानी झाली.

शंखतीर्थ : श्रीनृसिंहाचे शंख नावाचे आयुध या ठिकाणी वास्तव्य करते. कुबेराला शंख नामक निधी येथेच प्राप्त झाला.

गदातीर्थ : श्रीनृसिंह गदाधररुपाने या ठिकाणी वास्तव्य‍ करतात.

पिशाचमोचनतीर्थ : पितर पिशाचयोनातून मुक्त होण्यासाठी या तीर्थावर स्नानविधी करण्याविषयी सांगितले आहे. नारायण-नागबलीतील एक विधी या ठिकाणी केला जातो. म्हणतात की, पिशचमोचन तीर्थे अखिल भारतात तीन ठिकाणीच आहेत. ती अशी, नीरा-नरसिंहपूर, नाशिक आणि काशी.

गरुडतीर्थ: या स्थानी गरुडाने तप केल्याने त्याला अजिंक्य सामर्थ्याची प्राप्ती झाली. नंतर त्याने प्रत्यक्ष विष्णूशीच युध्द केले. त्याच्या युद्धकौशल्याने प्रसन्न झालेल्या श्रीविष्णूंनी त्याचा वाहन म्हणून स्वीकार केला.

श्रीनृसिंहती‍र्थ : हिरण्यरकशिपूचा वध केल्यानंतर श्रीनृसिंहानी या स्था‍नी वास्तव्य केले. हे स्थान अत्यंत एकान्त रम्य असून तेथे नीरेवर घाट बांधलेला आहे. त्या‍स नृसिंहघाट असे म्हणतात. घाटावर डोंगरकपारीतील मंदिरात श्रीनृसिंहाची तांदळास्वरुपी मुर्ती आहे. बाजूस यात्रेकरुंसाठी ओव-या बांधलेल्या असून त्यांपैकी एका ओवरीत श्रीमारुतीची मुर्ती आहे. हे बांधकाम श्रावण शु 5 शके 1777 रोजी पुर्ण होऊन त्या‍स 121 रुपये खर्च आला. नजिकच अश्वत्थवृक्ष आहे. येथील एकान्त तर इतका अदभुत की, नीरेच्या जलप्रवाहाच्या आवाजाशिवाय अन्य कोणताही आवाज येथे ऐकू येत नाही. जगात काही कोलाहाल आहे हे येथे पटणारही नाही. येथे तपश्चर्या केल्याने चतुर्विध पुरुषार्थाची प्राप्ती होते.

इंद्रतीर्थ : वृत्रासुराच्या हत्येने इंद्राला जे पाप लागले त्यार दोषापासून येथे स्नान केल्याने इंद्र दोषमुक्त झाला.

हंसतीर्थ : भगवान नृसिंहांनी हंसरुप धारण करुन या स्थानी ब्रम्हदेवाला ज्ञानोपदेश केला.

तारातीर्थ : या स्थानी महासती तारेने तपश्चर्या केली व प्रभू रामचंद्राच्या अनुग्रहाने तिला दिव्यज्ञानप्राप्ती झाली.

दुर्वासतीर्थ : या स्थानी तप केल्याने दुर्वास ऋषीला सिध्दी प्राप्त झाली.

कपिलतीर्थ : कपिल मुनींनी ऋषिमंडळीस सांख्यशास्त्राचा उपदेश या स्थानी केला.

गणेशतीर्थ : हे तीर्थ श्रीनृसिंहास अत्यंत प्रिय असे आहे. प्रत्येक शुध्द व वद्य चतुर्थीस या तीर्थावर स्नान करणे विशेष फलप्रद आहे. या तीर्थानजिकच गणेशगाव आहे. याशिवाय मरिची, क्रतु, सोम, वरुण, अश्विनी, अत्रि, अंगिरस, दक्ष, धनद, निऋति, पुलह, पुलस्त्य , वसिष्ठ, देवल, बृहस्पति, कुबेर, वायु, यम, वसु, भारद्वाज अशी प्रधान तीर्थे नीरेवर असून उपतीर्थे दर पाच हातांच्या अंतरावर आहेत.


भीमा नदीवरील तीर्थे


भीमेच्या प्रवाहाच्या दिशेने भीमा नदीवरील जी तिर्थे लागतात ती व त्यांचे माहात्म्य अनुक्रमे असे आहे.

दुर्गातीर्थ : येथे दुर्गेचे स्थान आहे. नदीच्या प्रवाहाच्या डाव्या बाजूस एका डोंगरकपारीत छोटेसे देऊळ बांधलेले असून तेथे दुर्गेचा तांदळा आहे. हिलाच ईवराई असे म्हणतात. ही देवी मूळची कोकणातील असून ती येथे आल्याची आख्यायिका आहे. डोंगरावर आणखी एक देऊळ असून तेथे शंकराचे स्थान आहे. यालाच विमलेश्वर असेही म्हणतात. दुर्गतीर्थाच्या आसमंतात कालरुद्र, भीमानृसिंह, महानादेश्वर, कुरुक्षेत्र स्था‍णुमहेश्वर ही तीर्थे आहेत.

कोटीतीर्थ : महर्षी नारदांचा आश्रम या स्थानी होता. त्यांचा वास या स्थानी सर्वकाळ आहे. तेहतीस कोटी देवता व सर्व तीर्थे येथे वास करुन श्रीनृसिंहाची उपासना करतात. शंकराचीप्रसिध्दी 43 स्थाने व तेथील तितक्यातच स्थानदेवता कोटीतीर्थास वास करतात.

गोतीर्थ : कामधेनूने या स्थानी श्रीनृसिंहास स्वहतोयाने अभिषेक केला. नजिकच चिंतामणीचे स्थान असुन कल्पेवृक्षसम अश्वात्थिही आहे.

भानुतीर्थ : भगवान श्रीसुर्यनारायणाची ही तपोभूमी. त्याला या स्थानीच ज्ञानप्राप्ती झाली. सुर्यग्रहण, संक्रमण, पर्वकाळ, रविवार व रथसप्तसमी या दिवशी येथील स्नानाचे महत्व विशेष आहे. भानुतीर्थावर एक अत्यंत देखणे आणि आटोपशीर असे सुर्यमंदिर नदीच्या पात्रात बांधविले आहे. त्यात सकळकळासह सूर्याची मुर्ती आहे. सध्या हे मंदिर गाळात बुजून गेले आहे.

चक्रतीर्थ : भक्त प्रल्हादाच्या रक्षणार्थ भगवंतांनी चक्र पाठविले त्याचा उदय या स्थानी झाला. चक्रावतार धारण करुन श्रीनृसिंह येथे वास्तव्य करतात.

नंदतीर्थ : या स्थाननी श्रीनृसिंहानी आपल्या नंदकनामे खडगाची स्थापना केली.

पाशतीर्थ, लांगलतीर्थ, मौसलतीर्थ : श्रीनृसिंहाच्या् या विविध खड्गांच्या् वास्तव्यांनी पुनीत झालेली ही तीर्थे आहेत. याखेरीज महापद्म व महाशंख ही तीर्थे संगमसन्निध आहेत.