श्री क्षेत्री क्षेत्रोपाध्यायांची (१) पुजाधिकारी (२) जोशी (३) धर्माधिकारी अशी तीन मूळ घराणे असून श्रींच्या पूजेसंबंधाने अधिकार पुजाधिकार्यां कडे, सर्व धार्मिक कृत्ये करण्याचे अधिकार जोशांकडे आणि क्षेत्र सीमेत होणारी सर्व धार्मिक कृत्ये योग्य तर्हे्ने होतात हे पाहण्याचे अधिकार धर्माधिकारी घराण्याकडे आहेत,. श्री दंडवते व श्री. डिंगरे हे पूजाधिकारी; श्री काकडे, श्री. जपे, श्री. मायभटे (तथा) वांकर, श्री. सुरू हे जोशी, आणि श्री अग्नीहोत्री, श्री अरगडे, श्री आचार्य, श्री इंगळे, श्री कोरांटक, श्री घोगरे, श्री देवळे, श्री डोळे, श्री भागवत हे धर्माधिकारी आहेत. क्षेत्रसीमेत धर्मकृत्ये करण्यात भक्तांना वरील तीनही घराण्यांचे सहाय्य होत असते.

  1. पंचामृतपूजा :-
    सर्वमान्य व आदर्श असा हा विधी आहे. या विधीत भक्त स्वहस्ते श्रीस पंचामृत स्नान घालतात, धूप दीपाने ओवाळून नैवेद्य समर्पण करतात.
  2. पवमान अभिषेक :-
    प्रात: पूजेचेवेळी हा विधी होतो. पंचसूक्त पवामानाचे पाच अध्याय म्हणतात, ते चालू असतांना श्रींच्या दोन्ही मूर्तींवर दुग्धाभिषेक शंखाने घालतात. या विधीस सोळा शेर दूध लागते. या विधीत पंचामृत पूजेचाही अंतर्भाव असतो.
  3. पाद्यपूजा :-
    श्रींच्या गाभार्यांतील दांडीखालील पादुकांची मंत्रोपाचारे पूजा करून श्रीस फळांचा नैवेद्य समर्पण करणे असा या विधीचे स्वरूप आहे.
  4. वस्त्रसमर्पण :-
    पंचामृत पूजेनंतर श्रीस नित्योपभोगासाठी वस्त्र वा अन्य भारी वस्त्रे समर्पावीत. भारी वस्त्रे श्रीस सणावारी घालण्यासाठी ठेवली जातात. अन्य वस्त्रे श्रीच्या उपभोगार्थ ठेवतात.
  5. कर्पुरारती :-
    धूप दीप ओवाळून श्रीस कोरान्नाचा नैवेद्य समर्पण करणे असा हा सूटसुटीत विधी आहे.
  6. अलंकार पूजा :-
    सायंपूजेचेवेळी भारी वस्त्रांनी श्रीची विशेष पूजा बांधून श्रीस उपलब्ध अलंकार घालतात. श्रीमूर्तीचे राजसरूप अलंकारपूजेत दिसते.
  7. दीपोत्सव:-
    सायंपूजेच्यासमयी देवालयाच्या तिनही दगडी गाभार्यांसतून पणत्या व मेणबत्या लावून तसेच सभामंडपातील हंड्या व झुंबरे यांतील दीप प्रज्वलीत करून दीपोत्सव करता येतो अलंकार पूजेचे वेळी दीपोत्सव करतात. श्री मंदीरास पालखीची प्रदक्षिणा घालावायाची असा हा विधी आहे.

अन्य सेवाकृत्ये :-

  1. क्षेत्रनिवास
    एकटयाने वा सहपरिवाराने श्रीक्षेत्री वास्तनव्यि करावयचे मनःपूत चिंतन हे क्षेत्रनिवासाचे फळ होय. देवस्थाकनाची स्थिती व रीतिरिवाज समजतात. मनःशांती मिळते.
  2. वारी धरणे
    प्रति-शनिवारी किंवा प्रति-मासी याप्रमाणे परस्थ भक्ता वारी धरुन श्रींच्या दर्शनास येतात. या वार्या पाच किंवा अकरा असतात व त्याप विनाखंड पार पाडाव्यात लागतात. आद्य नृसिंहास पाच वार्या करण्या चा प्रघात आहे.
  3. श्रींची वैशेषिक सेवा
    वरील कृत्यां खेरीज श्रींची वैशैषिक सेवा करण्यारचाही प्रघात आहे. यातील काही सेवा देह कष्ट विण्याखच्यार, झिजविण्याच्याआ स्वnरुपाच्याव असून काही आर्थिक बळावर करता येतात. या सेवांचे स्विरुप असे –
  4. अनुष्ठांन :
    विशिष्ट कालपर्यत श्रीक्षेत्री वास करुन श्रींच्या विविध मंत्रांपैकी वा स्तु‍तिस्तो त्रांपैकी एकाची वा अनेकांची पारायणे करावयाची हे अनुष्ठानाचे स्वारुप होय. देहास कष्ट देण्याची व ते सहन करण्यांची शक्ती व मनाची तयारी मात्र हवी. हे अनुष्ठाोन म्हनणजे एक प्रकारचे तपच होय. श्रीनृसिंहकवच, सहस्रनाम आदींचे अनुष्ठावन करतात.
  5. सेवा घालणे :
    सातत्याने शंभर दिवस चालणारी ही सेवा आहे. सेवा म्हणजे श्रींस एक लक्ष प्रदक्षिणा घालणे होय. प्रातःकाळी स्नाभन, संध्यावंदन, देवपुजा करुन नंतर देवळात जाऊन श्रीनृसिंहाची पूजा करुन सोवळयाने परिवार देवतासह श्रींस प्रतिदिनी एकशे आठ प्रदक्षिणा हातात जपमाळ धारण करुन घालावयाच्या. प्रत्येक प्रदक्षिणा होताच श्रींस साष्टांग नमस्कार घालवयाचा असे याचे स्वारुप आहे. अशा एकशे आठ प्रदक्षिणा झाल्यातनंतर एक हजार प्रदक्षिणा झाल्या असे मानावयाचा संकेत आहे. या प्रदक्षिणा घालण्यास रोज तीन ते चार तास लागतात. प्रदक्षिणा घालत असताना श्रीनृसिंहकवचाचे पाठ करावयाचे व प्रदक्षिणा घालून झाल्या वर प्रतिदिनी श्रीनृसिंहसहस्रनामाचा पाठ करावयाचा अशी रीती आहे. ही सेवा संपेपर्यत व्रतस्थ राहावयाचे. परान्न भक्षण करावयाचे नाही, ग्रामसीमा ओलांडायची नाही, श्माश्रू, मृदुशय्या, पादत्राणे घालणेही वर्ज्यन, सात्विक आहार घ्या वयाचा असा हा एकुण देहदंडाचा कडक विधी आहे.