आरती

कडकडिला स्तंभ गडगडिलें गगन |

अवनी होत आहे कंपायमान ||

तडतडलीं नक्षत्रे पडताती जाण |

उग्ररूपें प्रगटे नृसिंहवदन || १ ||

जय देव जय देव जय नरहरिराया | जय शामराया ।

आरती ओवाळू महाराजवर्या || ध्रु.||

एकविस स्वर्गमाळा डळमळली कैसी |

ब्रह्मयाच्या वाटे अभिनव चित्तासी ||

चंद्रसूर्य दोन्ही लोपति प्रकाशीं ||

कैलासीं शंकर दचके मनासीं || जय.|| २ ||

थरथरती त्या जटा जिव्हा तळलळित |

तीक्ष्ण नखांनीं दैत्य तो विदारीत ||

अर्धांगी कमलजा शिरीं छाया धरित |

माधव दासा स्वामी नरहरि शोभत ||

जय देव जय देव जय || ३ ||संचित करा

अ.क्र आरती/स्तोत्रे संचित करा
उग्रं वीरंसंचित करा
ध्यानाचे श्लोकसंचित करा
नृसिंह नमामिसंचित करा
देवते कुलदेवतेसंचित करा
व्दादशनाम स्तोत्रसंचित करा
श्री नृसिंह कवचसंचित करा
गजर संचित करा
करावलंबन स्तोत्रसंचित करा
अष्टोत्तर शतनाम स्तोत्रसंचित करा