॥ श्री लक्ष्मी नृसिंह ।।

श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट Reg.Under Bombay Public Trust Act.1950, Trust Reg. No.- A-58 (Pune)

नीरा नरसिंहपुर तर्फे आजपासून अखंड नंदादीप सुरू करण्यात आला आहे आजचे दाता श्री वैष्णव श्रीकांत माने पाटील अकलूज यांनी सुरुवात केली आपल्या देवस्थानला देणगी साठी आपण सर्व जण NEFT, UPI, GPay phonpe या आणि यासारख्या सोईंचा वापर मोठ्या प्रमाणात करतो आहोत आणि ते योग्यच आहे. या निरोपाद्वारे सर्वांना परत एकदा नम्र विनंती करत आहोत की:

  1. देवस्थनच्या खात्यात जमा झालेल्या देणगीचा हिशोब लावण्याच्या दृष्टीने आपण देणगी दिल्यानंतर कृपया देवस्थान कार्यालयात फोन अथवा ई-मेल द्वारे अवश्य कळवावे.
  2. देणगी देताना कृपया आपले नाव Remarks/Comments मध्ये पूर्ण लिहावे. त्यामुळे देणगीचा हिशोब लावताना सोपे जाईल .
  3. आपण दिलेल्या देणगीची पावती जरूर मागून घ्यावी. बऱ्याच जणांची अनामिक देणगी देण्याची तीव्र भावना आम्ही समजू शकतो पण कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने आणि सरकारी नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीने आपल्याला या देणग्यांच्या पावत्या करणे अनिवार्य आहे याची कृपया नोंद घ्यावी.
  4. देवस्थानने देवाच्या एका दिवसाच्या नैवेद्यासाठी रु ५०००/ त्यामध्ये सकाळची खीर, खिचडी ,दुपारचा महानैवेद्य, सायंकाळचा प्रसाद(बेसन लाडू )
  5. देवाचे हार फुले या साठी ५००/ पाचशे रुपये प्रति दिन
  6. देवापुढे आज पर्यन्त आपण तेलाचा दिवा / नंदादीप ( समया ) लावत होतो आता अखंड चांगल्या तुपाचा दिवा / नंदादीप लावण्याचा मानस आहे. यासाठी महिन्याला 10 किलो तूप लागणार आहे. त्यासाठी महिना ५०००/ रु लागणार आहेत ज्यांना एक महिना लावायचा आहे त्यांनी वरील रक्कम देणे आवश्यक आहे
  7. ज्यांना तूप द्यावयाचे आहे त्यांनी देवस्थान ट्रस्ट ऑफिसमध्ये तूप देऊन त्याची पावती घेणे आवश्यक आहे.
  8. कृपया देवस्थानला या बाबतीत सर्वतोपरी सहकार्य करावे ही नम्र विनंती.

देणगी

श्री निरा नृसिंहपूर देवस्थानास देण्यात येणार्या सर्व देणग्या भारत सरकारच्या आयकर कायद्याच्या ८०-जी अन्वये कर सवलतीस पात्र आहेत.
श्री लक्ष्मी-नृसिंह देवस्थान ट्रस्टचे देणगी स्विकारण्यासाठीचे अधिकृत खात्यांची माहिती खालील प्रमाणे आहे.

बॅन्केचे नाव : देना बॅन्क शाखा नरसिंहपूर
आयएफएससी कोड : BARB0DBNIPU
एमआयसीआर कोड : 413012513
जिर्णोध्दारासाठीचा खाते क्रमांक : 98690100002090
अन्नछत्रासाठीचा खाते क्रमांक : 98690100000116
भक्तांसाठी सूचना

श्री लक्ष्मी नृसिंह देवतांना अर्पण करावयाच्या मौल्यवान वस्तू उदा. सोन्या, चांदीचे दागिने व उपकरणी, निरनिराळ्या धातुंची भांडी, वस्त्रे वा इतर वस्तू श्री मुर्तींना अर्पण करण्यापूर्वी प्रथम देवस्थान कार्यालयात समक्ष दाखवून व त्याचे योग्य मूल्य नोंदवून नंतर संबंधित पुजार्यांसमार्फत देवतांना अर्पण कराव्यात. अर्पण करावयाच्या एकेक वा अनेक वस्तुंची एकत्रित किंमत – १५१ रु. किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर त्या वस्तू पूजा उतरल्यानंतर देवस्थान विश्वस्त मंडळाकडे जमा करावयाच्या असतात. याची संबंधितांनी नोंद घ्यावी. अशा अर्पण केलेल्या वस्तुंची पावती भक्तांस दिली जाते.