सर्वव्यापी नृसिंह

हिंदुस्थानात नृसिंहोपासना प्रागैतिहासिक काळापासुन प्रचलित आहे. हिंदू संस्कृंतीचा प्रसार झाला त्या सर्व देशातही नृसिंहोपासना पोचली, जावा, सुमात्रा, मलाया, बाली आदी देशांतुन आज ही नृसिंहोपासना चालते.

अयोध्‍या , उत्‍तर प्रदेश
चोवीस अवतार स्‍थानात एक नृसिंहस्‍थान

ऋषिकेष , उत्‍तर प्रदेश
हरिव्‍दार- ऋषिकेष या मार्गावर भारतमातामंदिरासमीप श्रीनृसिंहाचे स्‍वतंत्र मंदिर असून त्‍यात वरदहस्‍तयुक्‍त अशी विशाल नृसिंहमूर्ती आहे.

कर्णचास , उत्‍तर प्रदेश
ही कर्णाची तपोभूमी. घाटावरील मंदिरात नृसिंहमूर्ती

काल्‍पी , उत्‍तर प्रदेश
यमुनेच्‍या तीरावरील व्‍यासांच्‍या आश्रमानजीकच्‍या मंदिरात नृसिंहमूर्ती.

काशी , उत्‍तर प्रदेश
येथे नृसिंहाची कित्‍येक स्‍थाने व मंदिरे आहेत. नृसिंह मंदिरात नृसिंहाची विशाल मूर्ती. दुर्गा घाटावर व प्रल्‍हाद घाटावर अनेक नृसिंहस्‍थाने. दशाश्‍वमेध घाटावर व विश्‍वेश्‍वर मंदिर परिसरात कित्‍येक मूर्ती स्‍थाने पंचक्रोशीत ज्‍वालानृसिंह व लक्ष्‍मीनृसिंह. मोहल्‍ला राजमंदिरात लक्ष्‍मी-नृसिंहमूर्ती.

श्रींरगपट्टण , कर्नाटक
कावेरीच्‍या तीरावरील या क्षेत्रात श्रीरंग मंदिरासमोर नृसिंहमंदिर असून त्‍यात श्रीनृसिंहाची सुदर्शन मुर्ती आहे.

उड्डपी , कर्नाटक
हे मध्‍व संप्रदायाचे प्रमुख केंद्र. नृसिंह ही मध्‍वाचार्याची उपास्‍य देवता असून त्‍यांच्‍या मठात शालिग्रामशीला नृसिंहमूर्ती आहे.

कल्‍याणी , कर्नाटक
आज हे शहर बसवकल्‍याण या नावाने ओळखले जाते तेथील ऐतिहासिक किल्‍ल्‍यात नृसिंहमंदिर होते. यावनी सत्‍तेच्‍या काळात ते फोडले गेले. त्‍यांतील मूर्ती आज किल्‍ल्‍यांतील वस्‍तु संग्रहालयात आहे.

कुमसी , कर्नाटक
गाणगापूर नजीकेच प्रसिध्‍द नृसिंहस्‍थान

गलगली , कर्नाटक
गालव ऋषींची तपोभूमी. कृष्‍णेच्‍या काठावरील टेकडीवरील मंदिरात नृसिंहमूर्ती.

कोप्‍पर , कर्नाटक
कृष्‍णाकिनारी असलेल्‍या विशाल मंदिरात षोडशभुजांची शाळिग्राम पाषाणाची नृसिंहमूर्ती

अनागुंदी , कर्नाटक
तुंगभद्रेच्‍या तीरावरील मंदिरात नृसिंहमूर्ती आहे.

कनकगिरी , कर्नाटक
उत्‍कृष्‍ट मंदिर , देवाने डोळे दिले तर कनकगिरी मंदिर पाहवे अशी कानडी म्‍हण आहे. नृसिंहाचे स्‍वयंभू लिंग. मुखाकृती चिन्‍हास नृसिंह मानले जाते.

कित्‍तूर , कर्नाटक
मलप्रभेच्‍या तीरावरील अश्‍वत्‍थनृसिंह प्रसिध्‍द आहे.

कुंडली , कर्नाटक
तुंगा व भद्रा यांच्‍या संगमावरील मंदिरात नृसिंहमूर्ती

गंडीनृसिंह , कर्नाटक
अनागोंदी परिसरातील जागृत नृसिंहस्‍थान

गोकर्ण , कर्नाटक
सागरसान्निध्‍य लाभलेले नृसिंहस्‍थान. गोदातीर-गोदावरी नदीचा नृसिंहक्षेत्रांशी ऋणानुबंध दिसतो.

अडूर , कोकण , महाराष्ट्र
या विभागातील एक प्रसिध्‍द नृसिंह मंदिर

कुडाळ , कोकण , महाराष्ट्र
मंदिरात पितळी नृसिंहमूर्ती

गिर्ये , कोकण , महाराष्ट्र
मंदिरात संगमरवरी नृसिंहमूर्ती

कापशी , कोल्‍हापूर , महाराष्ट्र
सेनापती कापशी या नामे ख्‍यात असलेल्‍या व चिकोत्रा नदीच्‍या काठावर वसलेल्‍या या गावी नृसिंहमंदिर असून त्‍यात हिरण्‍यकशिपूवधकर्ती श्रीनृसिंह मूर्ती आहे.

कुरुंदवाड , कोल्‍हापूर , महाराष्ट्र
कृष्‍णा पंच गंगेच्‍या संगमावर संताजी घाट असून तेथे श्रीनृसिंहमंदिर आहे.

कांची , तामिळनाडू
हे शिवक्षेत्राप्रमाणे नृसिंहक्षेत्रही आहे. वेगवतीनदीच्‍या काठावर वरदराज मंदिरे. तिथे योग-नृसिंहमूर्ती.

इंदापूर , धाराशिव , महाराष्ट्र
हे गाव गपाट इंदापूर या नावाने परिचित आहे. येथे श्रीनृसिंहाचे बहुप्रसिध्‍द मंदिर असून तांदळास्‍वरुपी मूर्ती आहे हे स्‍थान नीरा-नरसिंहपूरचेच आहे.

कान्‍हेगाव , नाशिक , महाराष्ट्र
सेनापती तात्‍या टोपे यांच्‍या यागावी नृसिंहमंदिर असून टोपे घराणे हे येथील पुजारी आहेत. हे स्‍थान नीरा-नरसिंहपूर येथीलच आहे.

काठमांडू , नेपाळ
या राजधानीच्‍या शहरी नृसिंहमंदिर असून ते तत्रस्‍थ जोश्‍यांचे कुलदैवत आहे.

इंदापूर , पुणे , महाराष्ट्र
मालोजीराजे भोसले यांच्‍या गढीवर स्‍वतंत्र नृसिंहमंदिर असून त्‍यात श्रींचा भव्‍य तांदळा आहे.

इंदूर , मध्‍यप्रदेश
नृसिंहाची दोन मंदिरे 1. छत्रीबाग 2. नरसिंगबाजार

उज्‍जयिनी , मध्‍यप्रदेश
व्‍दादश ज्‍योतिर्लिगापेकी एक असलेल्‍या महांकाळेश्‍वर मंदिराच्‍या आवारात नृसिंह मंदिर असून त्‍यात नृसिंहाची काळया पाषाणाची मूर्ती आहे. क्षिप्रेच्‍या घाटावर आणखी एक नृसिंह मंदिर.

एरच , मध्‍यप्रदेश
वेत्रवतीनदीच्‍या तीरावरील मंदिरातील नृसिंहमूर्ती

खजुराहो , मध्‍यप्रदेश
नृसिंहमुखी विष्‍णुप्रतिमा

ग्‍वाल्‍हेर , मध्‍यप्रदेश
लष्‍कर भागात हिरण्‍यकशिपुवधकारी नृसिंहमूर्ती

अंबाजोगाई , मराठवाडा , महाराष्ट्र
जयंतीच्‍या तीरावर पुरातन मंदिर असून त्‍यात नृसिंहाची पाषाणमूर्ती आहे. नजीकच मुकुंदराजाची समाधी आहे.

गंगाखेड , मराठवाडा , महाराष्ट्र
गोदावरीच्‍या काठावरील मंदिरात काळया पाषाणाची नृसिंहमूर्ती

औढानागनाथ , महाराष्ट्र
व्‍दादश ज्‍योतिर्लिगापैकी एक असलेल्‍या या क्षेत्री नृसिंहमंदिर व मूर्ती आहे.

इचलकरंजी , महाराष्‍ट्र
हे ठाणे नीरानरसिंहपूरचे विशाल मंदिरात श्रीपादुका आहेत.

ऋध्दिपूर , महाराष्‍ट्र
महानूभावीयांचे प्रमुख क्षेत्र. या पंथात नृसिंह देवतेस स्‍थान आहे. नृसिंहमंदिरात नृसिंहमूर्ती. येथील राजमठ हे मूळचे नृसिंहमंदिरच आहे.

क-हाड , महाराष्‍ट्र
कृष्‍णा कोयना संगमक्षेत्र , कृष्‍णेवरील नृसिंहतीर्थावर नृसिंहमंदिर तीर्थरुपी नृसिंह

कुंर्डुवाडी , महाराष्‍ट्र
नदीकाठी मंदिरात नृसिंहमूर्ती ती सरकते अशी श्रध्‍दा.

कोल्‍हापूर , महाराष्‍ट्र
वरुणतीर्थानजिक , प्रसिध्‍द नृसिंहस्‍थान

कोळेनरसिंहपूर , महाराष्‍ट्र
पराशर ऋषींचे तपस्‍थान. कृष्‍णेच्‍या काठावर हिरण्‍यकशिपूविदारक पाषाणाची नृसिंहमूर्ती.

एरंडेश्‍वर , महाराष्‍ट्र
इकडील भागातील प्रसिध्‍द नृसिंह मंदिर

अबूपर्वत , राजस्‍थान
विमलशा मंदिरात हिरण्‍कशिपूवधकारी नृसिंहमूर्ती आहे.

औसा , लातुर , महाराष्ट्र
या गावी श्रीनृसिंहाची स्‍वतंत्र अशी चार मंदिरे आहेत.

अचलपूर , विदर्भ , महाराष्ट्र
अमरावती जिल्‍हयातील यागावी नृसिंहस्‍थान असून तेथे प्रतिवर्षी नृसिंहजयंतीदिनी नृसिंहावतार नाटय दृश्‍य स्‍वरुपात साकारले जाते.

 असदपूर , विदर्भ , महाराष्ट्र
येथेही नृसिंहवतार नाटयाची परंपरा आहे. ते नृसिंहजयंतीदिनी साकारते.

असतपूर , विदर्भ , महाराष्ट्र
सुपर्णा व चंद्रभागा संगमावरील मंदिरात काळया पाषाणाची मोठी नृसिंहमूर्ती आहे.

एरकी , विदर्भ , महाराष्ट्र
पुर्णा नदीच्‍या तीरावरील मंदिरात संगमरवी नृसिंहमूर्ती

अंजी , विदर्भ , महाराष्ट्र
चंद्रहासराजाशी संबंधित गाव. हेमांडपंती मंदिरात हिरण्‍यकशिपूवधकारी काळया पाषाणाची नृसिंहमूर्ती आहे.

अंजनगावसुर्जी , विदर्भ , महाराष्ट्र
मंदिरात नृसिंहाची पंचधातूची मूर्ती आहे.

असतपूर , विदर्भ , महाराष्ट्र
सुपर्णा व चंद्रभागा संगमावरील मंदिरात काळया पाषाणाची मोठी नृसिंहमूर्ती आहे.

किनगवराज , विदर्भ , महाराष्ट्र
मोठया मंदिरात सुंदर नृसिंहमूर्ती

गणेशपूर , विदर्भ , महाराष्ट्र
वर्धेच्‍या काठावरील टेकडीवर नृसिंहमंदिर. तिथे गारेची नृसिंहमूर्ती.

अकोट , विदर्भ , महाराष्ट्र
या विभागातील हे एक प्रसिध्‍द नृसिंह मंदिर.

काळेगाव , सोलापूर , महाराष्ट्र
बार्शी तालुक्‍यातील यागावी नृसिंहाचे पुरातन स्‍थान असून स्‍थानिक रणशूर मंडळींनी नूतन मंदिर बांधविले आहे.

वाशी , महाराष्ट्र
येथील कोणा कवडे उपनामक वृध्‍द भक्‍तांसाठी श्रीनृसिंह येथे आले अशी आख्‍यायिका आहे.

गंगोळी , कर्नाटक
पश्चिम समुद्रसान्निध्‍यातील नृसिंहक्षेत्र. अगस्ति ऋषिस्‍थापित नृसिंहमूर्ती.

चितळपुडी , कर्नाटक
मंदिरात योगनृसिंहमूर्ती. चंद्रगिरी(आंध्र प्रदेश

चेंबूर , महाराष्‍ट्र
अहोबल मठाचे रामानुजपंथी नृसिंहमंदिर

जगन्‍नाथपुरी , ओरिसा
पापुडिया मठात नृसिंहमंदिर

जनकपूर , बिहार
गौतमकुंडानजीक नृसिंहमंदिर

जमखिंडी , कर्नाटक
इकडील भागातील प्रसिध्‍द नृसिंहक्षेत्र

जयपूर , राजस्‍थान
राजधानीच्‍या या शहरी नऊ नृसिंह मंदिरे आहेत.

जोशीमठ , हिमालय
शंकाराचार्याच्‍या मठानजीक वासुदेव मंदिर आहे तेथे शाळिग्रामशिळेची अद्भुत नृसिंहमूर्ती आहे.

झाकोगाव , हिमाचल प्रदेश
सिमल्‍यापेक्षाही अधिक उंचीवरील भागात नृसिंहमंदिर.

टेहरी , हिमायल
- हिमालयीन प्रदेशात नृसिंह हे सर्वमान्‍य दैवत आहे प्रसिध्‍द नृसिंहमंदिर , टेभूर्णी (सोलापूर

तिरुपती , आंध्र प्रदेश
जागतिक कीर्तीचे हे मंदिर तिरुमलाई पर्वतावर असून या परिसरातील नृसिंह मंदिरही प्रसिध्‍द आहे.

तिरुपती , आंध्र प्रदेश
कल्‍याण मंडपातील स्‍तंभावर पावन नृसिंहमूर्ती , सोळा भुजांपैकी चौदा भुजांत आयुधे असून उर्वरित दोन भुजांनी हिरण्‍यकश्यपूवधकर्ती अशी अत्‍युग्र नृसिंहमुर्ती.

तिरुपती , आंध्र प्रदेश
रामानुज म‍ंदिराशेजारी योग-नृसिंहस्‍वामी मंदिर असुन त्‍यात योगनृसिंहमूर्ती आहे.

तिरुपती , आंध्र प्रदेश
तिरुममणी मंडपात स्‍तंभातून बोर पडत असलेल्‍या अशा नृसिंहावताराची उग्र अशी चतुर्भुज नृसिंहमूर्ती आहे.

तिरुमलराय , आंध्र प्रदेश
या प्राचीन मंडपात हिरण्‍यकशिपुवधकर्ती नृसिंहमूर्ती आहे.

तिरुमपुल , कर्नाटक
कपिला व कावेरी यांच्‍या संगमावर गुंजानृसिंह प्रसिध्‍द आहे यास नरीसपूर असेही म्‍हणतात.

तिरोडा , विदर्भ , महाराष्ट्र
वैनगंगेच्‍या पात्रात नृसिंहमंदिर

तुळजापूर , मराठवाडा , महाराष्ट्र
भवानी मंदिरातील आवारातील मंदिरात नृसिंहमूर्ती.

तेर , मराठवाडा , महाराष्ट्र
तेरणापिप्‍पोला संगमावरील जुनाट मंदिरात पाषाणाची स्‍वयंभू नृसिंहमूर्ती.

तोष्‍णूर , कर्नाटक
मंदिरात योगनृसिंहमूर्ती

तोरवी , कर्नाटक
विजापूरसमीप तोरवी नामे गाव आहे. येथे प्रसिध्‍द नृसिंहमंदिर आहे. श्रीमूर्ती भुयारातील गाभा-यात असून ती कृष्‍ण पाषाणाची व बहुभुजायुक्‍त व हिरण्‍याकशिपु विदारक आहे. प्रभावळीवर दशावतार आहे. मंदिर प्रशस्‍त आहे. श्री उत्‍तरादि-मठाचे विद्यमान स्‍वामी श्रीसत्‍यप्रमोदतीर्थ यांचा हा नृसिंह पुर्वाश्रमीचा कुलस्‍वामी असून माध्‍वांचे हे श्रध्‍दास्‍थान आहे.

तंजावर , तामिळनाडू
हे पाराशरक्षेत्र असून मंदिरात योग-नृसिंहाची पंचधातूची मुर्ती आहे.

त्र्यंबकेश्‍वर , महाराष्‍ट्र
ब्रम्‍हागिरनजीकच्‍या कुशावर्त कुंडाजवळ नृसिंहतीर्थ असुन तेथे काळया पाषाणाची नृसिंहमूर्ती आहे.

थुगाव , विदर्भ , महाराष्ट्र
गावाबाहेर मंदिर. मंदिरात नृसिंहाची पस्‍तीस फुट उंचीची मूर्ती. एक दुर्लक्षित स्‍थान.

दत्तिया , मध्‍यप्रदेश
झांशीनजीकच्‍या या गावी नृसिंह मंदरि प्रसिध्‍द आहे.

दिगरौता , हरियाना
भूनेश्‍वरतीर्थाजवळ नृसिंहमंदिर

दुधई , मध्‍यप्रदेश
पर्वतावर पंचेचाळीस फुट उंचीची कलात्‍मक नृसिंहमूर्ती

देऊरवाडा , विदर्भ , महाराष्ट्र
पूर्णेच्‍या तीरावरील मंदिरात वाळूची विशाल नृसिंहमूर्ती

देवगड , मध्‍यप्रदेश
दशावतार मंदिरात नृसिंहमूर्ती

देवपाडा , पश्चिम बंगाल
गंगेच्‍या परिसरात नृसिंह मंदिर

देवप्रयाग , हिमालय
अलकनंदा-भागिरथी संगमावर नृसिंहपर्वत पर्वतरुपी नृसिंह