श्री क्षेत्र नीरानरसिंहपूर हे सदा पवित्र असल्याने श्रीक्षेत्री केलेली पुण्यकृत्ये फलदायी असतात.

 1. 1. वसंतपूजा :
  वसंतऋतुत व प्रामुख्याने वैशाखी नवरात्रात पूजासाहित्याने प्रथम श्रींची पूजा करून नंतर ब्राह्मणांची पूजा केली जाते. कैर्यासचे पन्हे, खरबूजे, कालिंगडे व अत्तरमिश्रीत चंदानाची उटी ही वसंतपूजेची अविभाज्य अंगे आहेत.
 2. 2. धनुर्मास :
  धनसंक्रांत लागल्यानंतर सूर्योदयापूर्वी श्रीचे दर्शन घेऊन श्रींस खिचडीचा नैवेद्य अर्पण करतात.
 3. 3. कुरवंडी :
  नरकचतुर्दशीस व बलीप्रतिपदा या दिवशी श्रींची कुरवंड्यांनी आरती होते. या कुरवंडया पुरणाच्या व साखरभाताच्या करतात. भक्तांनाही स्वेच्छेनुसार पुजाधिकार्यां च्या संपर्काने संपर्काने कुरवंडी करता येते.
 4. 4. श्रीलक्ष्मीची ओटी भरणे :
  सुवासिनीने करावयाचा हा विधी असून सुवासिनी मातोश्रीची खणा-नारळाने व तांदुळ हळकुंडाने ओटी भरतात.
 5. 5. हळदी-कुंकवाचा सडा :
  हा विधी सुवासिनी करतात. श्रीलक्ष्मीची ओटी भरल्यानंतर हळदीकुंकू मातोश्रींस वाहून सर्व देवालयात हळदीकुंकूमिश्रित जलाचा सडा सुवासिनी स्वहस्ते शिंपते. सड्यावर रंगावली काढतात.