हे नरसिंहपुर येथील जोशी घराण्याततील. यांचे मूळ आडनाव मायभटे. यांनी प्रपंच सुखेनैव केला. पण त्यात गुरफटले नाहीत. कमलपत्राप्रमाणे अलिप्तं राहिले. शास्त्र मार्ग आजन्मै पाळिला. मंत्रातील अर्थ ध्यानात घेण्यावर यांचा विशेष कटाक्ष असे. नित्य स्थान, संध्यातवंदन, जपजाप्या, ब्रम्हायज्ञ, पुजा नैवेद्य, वैश्वदेव हे कटाक्षाने करीत. श्रींचे तीर्थ घेतल्याशिवाय कधीही अन्न ग्रहण केले नाही. पात्रात अन्न् कधी टाकले नाही. प्रत्येक एकादशी ही निर्जल व व्दादशी ही साधना केली. अंगुलीतील मुद्रिकेत शालिग्राम धारण करणारे अच्युतकाका श्रीनृसिंहाच्या निदिध्याकसाने, त्याच्या नामरुपगुणांच्या चिंतनाने नृसिंहरुप होऊ लागले. दुसरा विषय सुचना, रुचेना, देह विदेहावस्थेत जाऊ लागला. नृसिंहभक्ती पराकोटीस पोहोचली.

आयुष्याच्या शेवटी शेवटी त्यां च्याजवळ वाळूच्या डाळीच्या आकाराचे तीन कण होते ते त्यांना कोठुन मिळाले होते कोण जाणे. त्यांची ते पुजा करीत. त्यांना नृसिंह, लक्ष्मी आणि प्रल्हाद म्हणून संबोधीत. पुजा होताच त्यांनी संध्यापात्रात पाणी भरुन घ्यावे व त्यात ते तीन वालुकाकण सोडावे. आश्चर्य असे की, ते पाण्यावर तरंगत. बुडत नसत. चला आता भेटा असे म्हणताच ते तीनही खडे परस्परांना बिलगत. असा हा दास दासनवमी श्रीरुपी एकवटला. कणखर बांध्याची, पिळदार शरीराची ती ठेंगणी ठुसकी शालिग्राममूर्ती कायमची दृष्टी आड झाली.