हे नरसिंहपूर येथील पूजाधिकारी घराण्यातील. रघुनाथराव विंचूरकरांनी स्थापिलेल्या वेद व शास्त्र शाळेत यांनी रंगशास्त्री मायभटे यांचेकडे वेदशास्त्रांचा अभ्यास केला. मुळातच प्रखर असलेल्या यांच्या नृसिंहभक्तीस वेदातदेखील नृसिंह दिसला. विव्दता तर अशी की, हातातील वेताची छडी वाकवावी तसे शब्द व त्यांचे अर्थ यांना यांची परिणत प्रज्ञा वाकवी. व्देड विरुपेसूक्तांचा यांनी लाविलेला नीरानृसिंहपुर अर्थ पाहुन आजचे विव्दापनदेखील माना डोलावतात. हे उत्तकरादि मठाचे अनुयायी असून वैष्णव संप्रदायाचे निष्ठावंत अभिमानी व पराकाष्ठेीचे आचारनिष्ठा होते. वयाच्या पंचविशीच्या आतच यांचे निधन झाले. संन्यास दिल्यास जगेन असे त्यांनी सांगितले होते पण तसा योग्य नव्हता. व्देविरुपे सूक्तयभाष्यच हे त्यांचे एकमेव ग्रंथापत्ये.