चैत्र :

 1. गुढी पाडव्याच्या दिवशी श्रींना पवमान (पंचसुक्त) अभिषेक करण्यात येतो व अलंकार पूजा बांधण्यात येते तसेच मंदिरात गुढी उभारण्यात येते.
 2. रामनवमी दिवशी रामजन्म सोहळा साजरा केला जातो.
 3. हनुमान जयंती उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
 4. या दरम्यान शिखर शिंगणापूर येथे श्री महादेवाच्या दर्शनार्थ जाणारे यात्रेकरू मोठ्या प्रमाणावर श्रीदर्शनास येतात.

वैशाख :

 1. वैशाख नवरात्र महोत्सव – हा येथील सर्वात मोठा उत्सव. वैशाख शुद्ध ६(षष्ठी) श्रींचे नवरात्र उत्सवास प्रारंभ होऊन वैशाख शुद्ध १४ (चतुर्दशी)या दिवशी नृसिंह जयंती सायंकाळी जन्मकाळ सोहळा होतो.
 2. वैशाख शुद्ध १५ (पौर्णिमा) या दिवशी पारणे केले जाते त्या रात्री श्रींच्या पादुका पालखीत ठेवून सवाद्य मिरवणूक काढली जाते. दिपोत्सव होतो.
 3. पोर्णिमेच्या दुसरे दिवशी दही हंडी काला व लळीत होऊन उत्सवाची समाप्ती होते या दरम्यान उत्सवामध्ये श्रींसमोर भक्ती संगीत, भजन, व्याख्यान, प्रवचन व रात्री नारदीय कीर्तन सेवा इत्यादी कार्यक्रम केले जातात.
 4. उत्सव काळात श्रींस विविध अलंकार पूजा चंदनउटी पूजा, पुष्प रचना पूजा, महावस्त्र पूजा बांधण्यात येतात. संपूर्ण वैशाख महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नरसिंह भक्त कुलधर्म कुलाचार करण्यासाठी येतात. कित्येक येथेच नवरात्र बसवितात. नृसिंहभक्तांचा हा प्रीतिमेळावाच असतो. श्रींस पंचामृतपूजांस्ची तसेच वसंतपूजांची गर्दीहोते. गावात विविध खेळांच्या स्पर्धा, कुस्त्या होतात.
 5. वैशाख वद्य पक्षात पूजाधिकारी श्रींची प्रक्षाळपूजा करतात.

जेष्ठ :

 1. जेष्ठ शु. १ ते जेष्ठ शु. १० या दशहार पर्वकाळामध्ये श्रींस अनेक भक्तांकडून सेवा अर्पण केली जाते.
 2. वटपौर्णिमेस सुवासिनीकडून वडपूजन केले जाते.

आषाढ :

 1. आषाढी एकादशीस श्रींना महापूजा करण्यात येते.
 2. आषाढ शु. १५, गुरु पौर्णिमेस भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येतात.

श्रावण :

 1. नागपंचमीच्या दिवशी मंदिरामध्ये नागपूजन व सामुदायिक श्रावणी केली जाते.
 2. श्रियाळषष्ठी दिवशी पूजाधिकारी श्रियाळाची प्रतिमा देवालयात स्थापून तिचे पूजन करतात.
 3. गोकुळ अष्टमीस सप्ताह आयोजन करून श्रीकृष्ण जन्म साजरा केला जातो.

भाद्रपद :

 1. गणेश चतुर्थी उत्सव मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. गणपती अथर्वशीर्ष पठण व गणेश यागाचे आयोजन केले जाते.

अश्विन :

 1. अश्विन शु.१ ते अश्विन शु.९ शारदीय नवरात्र उत्सव मंदिरामध्ये साजरा केला जातो. घटस्थापना करून दररोज रात्री मातोश्रींची आरती होते.
 2. विजयादशमीस पूर्वाण्ही देवालयातील सर्व देवतांची पूजा होते. तसेच सर्व हत्यारांची पूजा होते. दसऱ्याच्या दिवशी श्रींस व महालक्ष्मीस महाअभिषेक, महावस्त्र पूजा अर्पण करण्यात येते. या दिवशी देवालयात प्रतिवर्षी एक भला मोठा धर्मध्वज लावला जातो. सायंकाळी सीमोल्लंघनासाठी श्रींची पालखी निघते व ती गावाच्या पश्चिमेस स्वामीसमाधीजवळ जाऊन तेथे सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो.
 3. अश्विनीपोर्णिमेपासून कार्तिकस्नान सुरु होते. सुर्योदयापूर्वी स्नानकरून श्रींचे दर्शन घेतात.
 4. नर्क-चतुर्दशी दिवशी पूजाधिकारी दंडवते यांच्याकडे कुरवंड्या होतात. त्या श्रींस ओवाळतात. श्रींस अलंकार पूजा बांधलेली असते. श्रींची पालखी निघुन ती संगमावर जाते.

कार्तिक :

 1. बलीप्रतीपदेदिवशी पहाटे श्रींस अभ्यंगस्नान घालून अलंकारपूजा बांधली जाते, या दिवशी डिंगरे पूजाधिकारी यांच्याकडे कुरवंड्या असतात. श्रींची पालखी निघून ती संगमावर जाते.
 2. कार्तिक शु.१२ या दिवशी, तुलसी विवाह केला जातो. या दिवशी श्रींची अलंकारपूजा बांधतात. पितळेच्या२ वृंदावनातील तुलसी श्रींचे डावे बाजू सिंहासनावर ठेवून मंगलाष्टककपूर्वक श्रींचा तुलसीशी विवाह लावला जातो.
 3. वैकुंठ चतुर्दशीस गरुडाची गावातून मिरवणूक निघते
 4. त्रिपुरी पौर्णिमेस कार्तिक स्नानन समाप्ती होते.

मार्गशीर्षः

 1. मार्गशीर्ष शु. पौर्णिमा या दिवशी श्रीदत्तोजयंतीचा उत्स व होतो.
 2. शके १७८७ साली रघुनाथराव विंचूरकरांनी देवालयाचा जीर्णोद्धार करून याचा उत्सर्ग केला होता.याचा वर्धापनदिन प्रतिवर्षी मार्गशीर्ष व.९-१० या दिवशी केला जातो

पौषः

 1. भोगी दिवशी श्रींची पालखी निघते. ती लक्ष्मी घाटावार श्रीलक्ष्मीे मंदिराकडे जाऊन नंतर गावातून मिरवते.
 2. मकर संक्रांतीचे दिवशी सुवासिनी श्रींस व लक्ष्मीस वाणवसा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. संक्रमण पर्वकाळानिमित्तर बहुत भक्ता येतात. यांत सुवासिनींचा भरणा जास्त् असतो. श्रीलक्ष्मीकस वाणवसा करणे हे सौभाग्यावती भाग्याुचे मानतात.

माघः

 1. माघी एकादशी व महाशिवरात्र या दोन दिवशी नीरा-भीमा संगम स्नान करून भक्त दर्शनास येतात.

फाल्गुनः
पौर्णिमेचे दिवशी देवालायामध्ये होळीकापूजन करतात.

 1. रंगपंचमी दिवशी श्रींस धवल रंगाचा पोशाख घालून श्रींचे अंगावर फुलाने केशरी रंग शिंपतात. रात्री देवालयात ग्रामस्था परस्पेरांवर प्रेमादरे रंग उडवून रंगपंचमी साजरी करतात.